“जयभीम पदयात्रा” चे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 14 एप्रिल 2025 रोजी “जयभीम पदयात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 एप्रिल 2025 रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावरुन सकाळी 7.30 वाजता “जयभीम पदयात्रे”ला सुरुवात होईल व या पदयात्रेचा शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ होणार आहे. या पदयात्रेत NCC, NSS, scout Guide तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत सर्वांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.