You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ११/0४/२०२५ रोजी माणगाव पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये माणगाव गावचे सरपंच माननीय भोसले मॅडम, माननीय सावंत सर, माननीय रामदास मल्हार सर, माणगाव पोलिस अधीक्षक वाघाटे सर व पालयेकर सर संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी प्रणाली दळवी,विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्था कर्मचारी प्रणाली दळवी यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच भोसले मॅडम यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले. सावंत सर यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच माणगाव पोलीस अधीक्षक वाघाटे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. पुनर्वसन केंद्राच्या वतीने विनोद गोसावी व धोंडी परब कानाची मशीन देण्यात आली. व अनिल कोकरे यांना अंध काठी देण्यात आली. व दोन दिव्यांग व्यक्तींना वॉकिंग स्टिक देण्यात आले.संस्थेच्या वतीने उपस्थित दीव्यांग बांधवाना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते.उपहाराची व्यवस्था माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.संस्था कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले

प्रतिक्रिया व्यक्त करा