You are currently viewing पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांची जिल्हा बँक प्रधान कार्यालयाला भेट

पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.जयकुमार रावल यांची जिल्हा बँक प्रधान कार्यालयाला भेट

*मनीष दळवी यांनी केले स्वागत*

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी त्यांच्या विविध विषयांवरील समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत मत्स्य, व्यवसाय व बंदरे विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नाम. नितेश राणे मा. आम. दिपक केसरकर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे संचालक रुपेश बेलोसे, डॉ. परशराम पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगांवकर, विठ्ठल देसाई, व्हीक्टर डान्टस, गणपत देसाई, श्रीम. प्रज्ञा ढवण, श्रीम. नीता राणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच आंबा व काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा