शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन
परशुराम उपरकर मित्र मंडळाचे आयोजन ; रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत होणार
कणकवली
शिवसेना नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व परशुराम उपरकर मित्रमंडळ शिवसेना कणकवली यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदू तपासणी करुन आवश्यकतेनुसार डोळ्यांची शस्त्रक्रिया मुंबई येथे मोफत केली जाणार आहे.
रविवार दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे नेत्रतपासणी शिबिर भवानी सभागृह, श्री. परशुराम उपरकर यांच्या कार्यालयाशेजारी, कणकवली येथे होणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी संतोष सावंत 9923422524, गणेश पारकर 9403819966, प्रणव उपरकर 7083801557, , शैलेश नेरकर 7498976233, चंद्रशेखर उपरकर 9022621723, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन परशुराम उपरकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.