सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे
माझ्या ७५ व्या वर्षी जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाख झाले पाहिजे
‘खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा झाला थाटात
सिंधुनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो. जे मिळविले ते हिमतीने आणि कष्टाने मिळविले.माझ्या कोकणात मी गरिबी ठेवणार नाही हा १९९० साली संकल्प केला होता.आज जिल्हा विकासाच्या प्रगतीवर आहे. गोवा ते खारेपाटण महामार्ग सुशोभिकरण होणार आहे. माझ्या जिल्ह्यात गरिबी ,कुपोषण असता कामा नये. तुम्ही उद्योग व्यवसाय करायला शिका. जेणे करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काम करा.हा विकास झाला पाहिजे. माझ्या ७५ व्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाखापर्यंत पोहोचले पाहिजे असे काम करा. माझे आयुष्य वाढण्यास तुम्हा सर्व जनतेचा मोठा वाटा आहे. अशीच साथ मला कायम द्या. असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री, खास नारायण राणे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सिंधुनगरी येथे शरद कृषी भवनात हा अनेक उपक्रम, विकास कामे, व अनेकांच्या कौतुक सोहळ्याने झाला.७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओरोस शरद कृषी भवन मध्ये भव्य दिव्य असा ‘खास दिवस खासदारांचा’ हा विशेष वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी सपन्न झाला खासदार व उत्सवमूर्ती नारायण राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमचा छानदार शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सौ. नीलमताई राणे, अभिनेत्री क्रांती रेडकर, आयपीएस अधिकारी समीर वानखेडे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजू परब, संजय आंग्रे, काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कार्यक्रम आयोजक मनीष दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष व्हिक्टर डांट्स, संदीप कुडतरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. नारायण राणे म्हणाले, साथ चांगली असली तर प्रवास चांगला होतो. आवडी निवडी,आजारपण सर्व पत्नी पाहते. निलेश नितेश चांगले शिकले. १० वाजण्याच्या आत घरात प्रत्येकाने पोहोचले पाहिजे असा आमचा आग्रह.आम्ही व्यावसायिक आहोत.मात्र सर्व व्यवसाय आणि आर्थिक शिस्त पत्नी नीलम यांच्या मुळे लागली आजही ती व्यवसाय पाहते. बँकेत आम्ही कधीही गेली नाही अशी साथ पत्नीची मिळाली.मैत्री जोपासणारे आणि मला काय हवे आहे हे समजून काम करणारे माझे कार्यकर्ते आणि मित्र आहे.त्यामुळे मी घडत गेलो.अशा आठवणींना उजाळा देत माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी आपल्या जीवन पट उलगडला.त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचे उदाहरणे सुद्धा यावेळी दिली. गुंड दाऊद इब्राहिम कशा पद्धतीने मुंबई मध्ये काम करायचा आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि शिस्त लावली. त्याची उदाहरणे दिली.
सर्व विकास होतो तो आपल्याच करातून होतो तेव्हा आपण किती सरकारला कर देतो याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी देशाला कर देणारे बनले पाहजे त्यासाठी इन्कम वाढवा असे काम करा. असे आवाहनही खा.राणे यांनी केले.
बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..! – आमदार निलेश राणे
बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..! आता सर्व मिळाले आहे. हसत खेळत रहा. आई आणि कुटुंब हसत खेळत राहु दे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी भावनिक शब्दात वाढदिवसाच्या खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या.
मागे एका कार्यक्रमात बोललो होतो की, आज त्यांना ७३ वर्षे पूर्ण ७४ वर्षात प्रवेश हे त्यांचे वय. ह्याच हॉलमध्ये आपण ते सभा किंवा कार्यक्रम असाच घेतला होता आजही ७३ कंप्लीट वाटत नाही पण मी तेव्हाही बोललो होतो की ते ७३ चे आहेत ते जर खरे वय पाहायचे असेल तर माझ्याकडे बघायचं. माझे वय पहिला की साहेबांचे वय दिसेल.मंत्री नितेश कडे बघितल्यावर कळणार नाही मात्र माझ्या दाढी पिकलेली पहिली की बाबांचे वय कळते.
त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी बोलतो तेव्हा माजी खासदार हे पद होते आता आमदार या नात्याने बोलतोय दहा वर्षे साहेबांचे वाढदिवस साजरा करत होतो. नेते साजरा करत होते.साहेब तुमची सगळी मनोकामना पूर्ण झालेली आहे. सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत.मात्र मला स्वप्नात बघा. जसे नितेश ला स्वप्नात पाहिले तसे पुढच्या वेळी मला आधी स्वप्नात बघा.हे नितेश राणे यांची परवानगी घेऊन बोलतो.असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
केंद्राने नेहमी कोणाकडे बघून लक्ष द्यावं तर असे काही नेते आहे की ज्यांना माहिती आहे की ते तिकडे आहेत म्हणून त्यांचे लक्ष ऑटोमॅटिकली जाते. आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आपण सगळे मोठे प्रचारक होतात त्यांचे.सिंधुदुर्गाच्या एक लाखाच्या लीडमुळे साहेब पन्नास हजारांनी खासदार झाले.त्यानंतर आमदारकीची निवडणूक झाली नितेश आमचा ५८,००० मतांनी निवडून आला. केसरकर साहेब आपले ४०- ४१ हजार मतांनी निवडून आले आणि माझं काही खरं नव्हतं.. पण माझा विजय झाला. सगळं शक्य झालं साहेब फक्त तुमच्यामुळेच! .
राणेसाहेब नेहमी म्हणतात, माझे दुःखाचे दिवस लोकांना नाही सांगणार त्यांचं दुःख कसं घालवता येईल त्याच्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करणार! हे वाक्य माझ्या डोक्यातून कधी गेले नाही… म्हणून साहेब आपण असेच तरुण राहा।.
बाबा तुम्ही आता रिलॅक्स व्हा..! हसत खेळत रहा. आई आणि कुटुंब हसत खेळत राहुदे अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी भावना व्यक्त करत वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या.
नारायण राणे यांच्या रुपाने जिल्ह्याला मिळालीय मोठी शक्ती – अभिनेत्री क्रांती रेडकर
राणे परिवार कोकणातील जनतेसाठी मनापासून काम करतो, खा.नारायण राणे यांचे स्वप्न व नेतृत्व या भागाच्या विकासाठी झटत आहे. या भागात व्यावसायिक बदल झाले पाहिजे अशी अपेक्षा जिल्हावासियांच्या वतीने अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी व्यक्त केले. राणे कुटुंबाने आणि राणे साहेबांनी अन्यायाच्या विरोधातील लढण्याची ताकद उभी केली आहे. सत्याच्या बाजूने उभा राहणारा हा राणे परिवार… त्यांच्या रुपाने एक मोठी शक्ती या जिल्हाला मिळाली आहे. असे गौरवोद्गार सिंधुकन्या अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी काढले. माझे सिनेमा व माझी कलाकृती या कोकण व या जिल्हाचा विकासासाठी कायम काम करत राहिन अशी ग्वाही देत खा. नारायण राणे यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
दरम्यान समीर वानखेडे यांनीही खा. नारायण राणे यांना वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आपल्यासाठी मुंबई वरून आलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदल आणि विकास नारायण राणे यांच्या मुळे झालेला आहे. इथला निसर्ग प्रेरणा दाई आहे.त्यामुळे या ठिकाणी येत राहणार असे समीर वानखेडे म्हणाले.
कोकण व रानेसाहेंबामध्ये अतुट नाते -ना. नितेश राणे
राणे साहेबाना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ते कोणही सुटणार नाहीत. त्याचा हिशोब होणारच. जेवणावरून उठवून अटक करण्याचा व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे. तो डिलिट केला नाही जेव्हा त्याची परतफेड करणार तेव्हाच तो डिलिट करणार असा इशारा मंत्री ना.नितेश राणे यांनी दिला.
आज व्यासपीठावर पाहिल्यानंतर एकंदरीत या पूर्ण दहा वर्षा जे २०१४ ते आतापर्यंत जो काळा होता तो माझ्या नजरेसमोर येतो. दहा वर्षांमध्ये खूप काही गोष्टी बदलल्या पण एक गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे कोकण आणि कोकणचे राणे साहेबांमध्ये असलेलेल अतूट नाते. संघर्षाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले.काही लोकांनी तेव्हा सांगून टाकले की राणे संपले अशा वल्गना केल्या होत्या.आज ते सगळे एकत्र विरोधी पक्षांमध्ये बसलेले आहेत. नजरेसमोर पाहण्याची संधी माझ्यासमोर होती म्हणून सातत्याने विधिमंडळ असो आणि असंख्य बैठकांमध्ये कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतोय, पालकमंत्री म्हणून काम करतोय. कोकणाच्या जनतेला चांगल्या गोष्टी माहिती आहेत. जनता सुज्ञ आहे.
जे काय स्वप्न पाहिले ती पुर्ण करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आलेली आहे. आमच्यासाठी पक्ष म्हणजे नारायण झाले आम्ही समर्थक म्हणजे राणे समर्थक.. वारंवार तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो आता तुमचे दिवस आले आता तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल एवढा विश्वास तुम्हाला सगळ्यांनी दिलेली साथ फार महत्वाची होती.असे उद्गार ना. नितेश राणे यांनी काढले.