भजनसम्राट बुवा. प्रकाश पारकर यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या “महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी” नियुक्ती
भजन परंपरा अविरत टिकविण्यासाठी मी कायम तत्पर, नूतन संघटन नव्या जोशाने करणार-बुवा प्रकाश पारकर
कणकवली :
कोकणातील भजनसम्राट भजनी बुवा प्रकाश पारकर यांची अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाच्या “महाराष्ट्र राज्य महामंडळ अध्यक्ष” पदी निवड झाली. भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा यांनी आपले आयुष्य भजन क्षेत्रासाठी वेचले आहे. भजन सांप्रदायासाठी पारकर बुवा यांचे मोठे योगदान आहे. जाणत्या भजन मंडळींमध्ये कमी वयाचे भजनसम्राट बुवा म्हणून बुवांनी लहानपणीच ओळख मिळवली. भजन क्षेत्रासोबत राजकीय प्रवास देखील त्यांचा उल्लेखनीय राहिलेला आहे.
मतदानाचा अधिकार नसतानाही गावचा शाखाप्रमुख पदापासून त्यांचा राजकीय सुरुवात झाली. राजकारणात देखील अतिशय उच्च दर्जीय पद त्यांनी भूषवली. सोबतच भजन परंपरा अविरत टिकवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हे लक्षणीय आहेत. याचेच फलित म्हणून अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाच्या “महाराष्ट्र महामंडळ अध्यक्ष” पदी बुवांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. या नियुक्तीने बुवा संजय गावडे यांनी सुरू केलेल्या चळवळीत प्रकाश पारकर बुवा यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे.
भविष्यकाळात जुन्याजाणत्या भजन सम्राट भजनी बुवांसोबत तरुण भजनी बुवांना सुद्धा एकत्र करून नवे व्यासपीठ निर्माण करण्याचा ध्यासच जणू प्रकाश पारकर बुवा यांनी घेतला. या नियुक्तीमुळे भजनसम्राट प्रकाश पारकर बुवा यांचे सर्व भजन संप्रदायातून कौतुक होत आहे. या नियुक्तीनंतर अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचे संस्थापक बुवा. संजय गावडे तसेच सर्व राज्यस्तरातील पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष योगेश पांचाळ बुवा यांनी स्वागत केले आहे.