रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे पेशंट घेऊन जात असलेली असलेली ॲम्बुलन्स पलटी
सुदैवाने दुर्घटना टळली सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.
सावंतवाडी
गोव्यावरून पुणे येथे पेशंटला घेऊन जाणारी ॲम्बुलन्स माजगाव माटव हॉटेलच्या वळणावर पलटी झाली . यामध्ये वृद्ध सिस्टर उबाल्डा डिसोजा79, सिस्टर बेनिता अल्मेडा 61, सिस्टर जेसीता फर्नांडिस 50, सिस्टर, इसीजा फर्नांडिस 50 या चौघानाही किरकोळ दुखापत झाली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची 108 चे ड्रायव्हर रामचंद्र निकम त्वरित घटनास्थळी पोहोचवून सदर पेशंटला सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व मुद्राळे यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे.