You are currently viewing सिंधुदुर्ग पोलीस उपनिरीक्षक संजय साटम यांना राष्ट्रपती पोलीस पदक…

सिंधुदुर्ग पोलीस उपनिरीक्षक संजय साटम यांना राष्ट्रपती पोलीस पदक…

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरी येथे बॉम्ब शोधक नाशक पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले संजय पुंडलिक साटम यांच्यासह महाराराष्ट्रतील ५७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना गौरवपुर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला जाहीर झालेल्या ५७ जणांमध्ये सिंधुदुर्गातील एकमेव अधिकाºयांचा समावेश आहे.संजय साटम यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संजय साटम यांनी १९८८ साली पोलीस दलात सेवा सुरू केली. त्यांनी गडचिरोली, ठाणे शहर येथे सेवा करत असताना सिंधुदुर्गात त्यांची बदली झाली. ३३ वर्षाच्या सेवेत साटम यांना आतापर्यंत वरिष्ठ अधिकाºयांकडून चांगली कामगिरी केल्याबद्दल २७ प्रमाणपत्रे, ४२८ बक्षिस मिळाली आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये पोलीस महासंचालकांकडून उत्कृष्ठ सेवेबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करत असताना त्यांनी भारतातील सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले असून या प्रशिक्षणामुळे कोकण रेंजमधील शेकडो स्फोटके तातडीने नाश करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा