खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने फळांचे वाटप
कणकवली :
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचा आज १० एप्रिल रोजी वाढदिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला . शिवसेना पक्षाच्यावतीने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटण्यात आली. यावेळी रुग्णांनी खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आभार देखील मानले.
उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख दामू सावंत, तालुकाप्रमुख महिला प्रिया टेंबकर, उपतालुका प्रमुख देवयानी एकावडे, विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर, बाबू आचरेकर व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते.