सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवध योजनांचा सन 2024-25 मधील 100 टक्के खर्च
सिंधुदुर्गनगरी
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा माहे मार्च 2025 अखेर 100 टक्के खर्च झाला असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
शिक्षण शाखेच्या योजनांमधील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरीता सन 2024-25 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या 1 हजार 131 पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटीमार्फत रक्कम रू. 259.82 लक्ष इतका निधी, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क फ्रिशीप योजनेकरीता 270 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 243.14 लक्ष इतका निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमार्फत 63 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 1.89 लक्ष इतका निधी, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजनेकरीता 99 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 7.54 लक्ष इतका निधी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेमार्फत 14 पात्र लाभार्थ्यांना रक्कम रू. 1.60 लक्ष इतका निधी, सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेमार्फत 07 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 1.05 लक्ष इतका निधी, स्वाधार योजनेंतर्गत 32 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 9.86 लक्ष इतका निधी वितरीत करणेत आलेला आहे. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेमार्फत 14 हजार 145 पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 3000/- रू.प्रमाणे रक्कम रू. 4243.50 लक्ष इतका निधी वितरीत करणेत आलेला आहे.
रमाई आवास घरकुल योजना ग्रामीण भागातील 138 घरकुले मंजूर असून रक्कम रू. 165.60 लक्ष इतका निधी व शहरी भागातील 03 घरकुले मंजूर असून रक्कम रू. 7.50 लक्ष इतका निधी लाभार्थ्यांना वितरीत करणेत आलेला आहे. अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 07 गुन्हे घडलेले असून प्रकरणांना रक्कम रू. 7.50 लक्ष इतके अर्थसहाय्य पीडीत व्यक्तींना PFMS द्वारे बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेला आहे.
जिल्हा वार्षिक अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांना रक्कम रू. 51.60 लक्ष इतका निधी, पशुसंवर्धन विभाग सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 5.00 लक्ष, जिल्हा क्रिडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 7.00 लक्ष, महिला बाल कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 3.00 लक्ष, जिल्हा माहिती कार्यालय सिधुदुर्ग यांना माहिती व प्रसिध्दीसाठी रक्कम रू. 56.00 लक्ष, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग यांना दलित वस्ती सुधार योजना व शिष्यवृत्ती योजना यासाठी रक्कम रू. 442.19 लक्ष, नगरप्रशासन अधिकारी नगरविकास शाखा सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 200.74 लक्ष, जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 3.70 लक्ष, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग यांना रक्कम रू. 2.50 लक्ष, शिक्षणाधिकारी योजना यांना रक्कम रू. 1.00 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आलेला असून सदर निधी 100 टक्के खर्च झालेला आहे.