*सावंतवाडीतील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून नाग्या महादू निवासी वस्तीगृहाला मदत*
सावंतवाडी :
माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढ दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीतील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक यांनी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेतील नाग्या महादू वस्तीगृहाला भेटवस्तू व कपडे दिले.
यावेळी सिंधुदुर्गातील प्रतिथयश वकील तथा सावंतवाडी पालिकेचे माजी सभापती ॲड.परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, माजी नगरसेवक गुरु मठकर, शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, वस्तीगृह संचालक उदय आईर, एनजीओ भागव शिरोडकर, सौ. शिरोडकर तसेच वस्तीगृहातील मुले उपस्थित होती.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वस्तीगृहाच्या कल्याणासाठी आवश्यकत्या उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास ॲड.परिमल नाईक यांनी व्यक्त केला.