*पीएम श्री बांदा केंद्रशाळा आदर्शवत -कोकण सहाय्यक आयुक्त डॉ.घोरपडे*
*बांदा*-
१७१वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामीण भागातील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळने सध्याच्या स्पर्धेच्या युगात शाळेच्या पटसंख्या वाढवण्याबरोबर शाळेचा गुणात्मक दर्जा टिकवून ठेवणारी आदर्शवत शाळा असल्याचे मत कोकण विभागीय सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदिप घोरपडे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री १००कलमी कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा भेटी दरम्यान सहाय्यक आयुक्त श्री घोरपडे यांनी शाळा,अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आदि शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. बांदा येथील केंद्र शाळेला भेट देऊन शाळेतील विविध भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या सुविधा,शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची शालेय प्रगती, लोकसहभाग आदि बाबींची पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत केले.यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण, पदवीधर शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे, कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरक उपस्थित होते.