You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

*खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न*

वेंगुर्ला

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय मानसीश्वर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या सहकार्यांने माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला कॅम्प येथे करण्यात आले. ही स्पर्धा ” क्रीडा महाकुंभ 2025 ” चा भाग म्हणून उत्साहात पार पडली.
या व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात एरिक स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर भूमिका पालये, गोवा हा संघ उपविजेता ठरला. जय मानसीश्वर वेंगुर्ला संघाने तृतीय क्रमांक, तर सावंतवाडी स्पायकर संघ चौथ्या क्रमांकावर आला.

व्यक्तिगत कामगिरीचे मानकरी पुढीलप्रमाणे होते:

बेस्ट अटॅकर – राजाराम तेरेखोलकर (जय मानसीश्वर वेंगुर्ला)

बेस्ट सेटर – जीवन पवार (एरिक स्पोर्ट्स वेंगुर्ला)

बेस्ट लिबेरो – यतिश मोरजकर (भूमिका पालये गोवा)

प्लेयर ऑफ द टूर्नामेंट – प्रथमेश सरगुले (एरिक स्पोर्ट्स वेंगुर्ला)

सर्व विजेत्यांना चषक व रोख रक्कम देऊन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई तसेच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बक्षिस वितरणप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत असून, क्रिडा क्षेत्रातही नव्या पिढीला संधी देण्याचा आमचा कटिबद्ध हेतू आहे. या स्पर्धेमधून खेळाडूंना आत्मविश्वास, नेतृत्व आणि संघभावना याचे धडे मिळतात. क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे.”

या स्पर्धेचे उत्तम आयोजन करण्यासाठी जय मानसीश्वर मित्रमंडळ – उभादांडा , वेंगुर्ला यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
पंच म्हणून अजित जगदाळे सर, हेमंत गावडे सर, राधाकृष्ण पेडणेकर, घोरपडे सर यांचे मोलाचे योगदान लाभले.
गुणलेखक – संदीप शेट्ये, सॅमसन फर्नांडिस
समालोचक – जयेश परब व मंथन परब
ही संपूर्ण स्पर्धा खेळाडूंना एक नवा उत्साह व प्रेरणा देणारी ठरली.
या स्पर्धेसाठी तहसीलदार ओंकार ओतारी, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, एक्स-सर्व्हिसमॅन सोशल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन – मुंबईचे समरजीत सरोज, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, खर्डेकर महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक जे. वाय. नाईक सर, माजी हॉलीबॉलपटू सुनील निरावडेकर, युवा मोर्चाचे पिंटू सावंत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुजाता देसाई यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल व टी-शर्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा