श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, तिथवली शाळेचे STS व APJ परीक्षेत घवघवीत यश!
तिथवली
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, तिथवली नंबर एक या जिल्हा परिषदेच्या शाळेने 2025 मध्ये घेण्यात आलेल्या STS (Sindhudurg Talent Search) व APJ अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा या स्पर्धां परीक्षे मध्ये अपूर्व यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे यशाचा संपूर्ण झेंडा मुलींनी फडकवला आहे.
STS परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे:
अर्णवी सचिन झाटे (इयत्ता तिसरी) – 168 गुण मिळवत गोल्ड मेडल
रोझान गुलजार काझी (इयत्ता चौथी) – 168 गुण मिळवत गोल्ड मेडल
वैष्णवी पांडुरंग हरयाण (इयत्ता चौथी)– 134 गुण मिळवत सिल्वर मेडल
यासोबतच, कुमारी रोझान गुलजार काझी हिने APJ अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावत मोठी कामगिरी बजावली आहे. यामुळे तिची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता असून, हे गावासाठी अत्यंत अभिमानास्पद यश आहे.
या परीक्षे मध्ये कुमारी स्वरा बाळकृष्ण किणेकर हिने देखील
तालुक्यात प्रथम दहा विद्यार्थ्यां मध्ये येण्याचा मान मिळवला आहे
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा शाळेमध्ये शिक्षक वर्ग, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना विदयार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे पालक गुलजार काझी यांच्या कडून नमूद करण्यात आले तसेच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत दाखल न करता मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करावे असे आव्हान गुलजार काझी यांनी पालकांना केले आहे. यावेळी पालकांकडून शिक्षकांचे विशेष आभार माणण्यात आले.
शाळा व्यवस्थापण कमिटीचे अध्यक्ष रोहीन कुडाळकर यांनी देखील मुलांचे विशेष कौतुक केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी अशा प्रकारे यश मिळवणे हे गाव, शाळेसाठी गौरवाची गोष्ट आहे.