देवगड :
खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल २०२५ रोजी देवगड येथे भारतीय जनता पार्टी आणि इको व्हीलर ग्रुप आयोजित भव्य सायकल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते तळेबाजार येथे खुला गट २५ किलोमीटर, १२ वर्षाच्या आतील आणि महिलांसाठी ११ किलोमीटर जामसंडे भारतीय जनता पार्टी कार्यालय ते दाभोळ तिठा येथे सकाळी ६.०० वाजता सुरू होणार आहे. या रॅलीचे उद्घाटन माजी आमदार ॲड अजित गोगटे व बाळ खडपे यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून होणार आहे. सहभागी सायकलपटूंना टी-शर्ट मेडल प्रशस्तीपत्रक मिळणार आहे. रॅली मार्गावर पाणी, ॲम्बुलन्सची सोय तसेच रॅलीसाठी हेल्मेट आवश्यक आहे. सकाळी ८.०० वाजता माननीय खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे केक कापणे, सकाळी ९.३० वाजता खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड ग्रामीण रुग्णालयाला कपाट भेट, सकाळी १० वाजता देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत ७४ सोनचाफा कलम वाटप, सकाळी ११ वाजता असलदे येथे दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू व काही भेटवस्तू प्रदान अशाप्रकारे कार्यक्रमाची नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा देवगड मंडळ तालुका सरचिटणीस कसा देवगड जामखेड नगरपंचायत नगरसेवक शरद ठुकरूल यांनी पत्रकारांना दिली.