खास. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसा निमित्त पाल येथे आज २० – २० डबलबारी भजनाचा जंगी सामना
वेंगुर्ले : प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पाल- भाजपा बुथ कमिटी तर्फे पाल येथील श्री खाजणादेवी मंदिर भव्य पटांगण येथे २० – २० डबलबारी भजनाचा जंगी सामना आज बुधवार ९ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ८.०० वा. आयोजित करण्यात आता आहे.
श्री भूवेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी ( देवगड) चे बुवा श्री संतोष दत्ताराम जोईल गुरुवर्य : श्री श्रीधर बुवा मुणगेकर, पखवाजः अक्षय मेस्त्री तर तबला साथ मांगरीश घाडी करणार आहेत. आणि त्यांच्या समोर श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे (कुबळ) चे बुवा : श्री गुंडू सावंत असणार आहेत. गुरुवर्य : श्री अशोक सावंत यांच्या आशीर्वादाने पखवाज साथ विराज बावकर व तबलाः संकेत गोसावी साथ करणार आहेत.
तरी सर्व भजन रसिकांनी या सूवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे