*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लंकेवर विजय* (रामसीता मिलन)
राम रावण युद्ध चाले मदतीला वानरसेना
रणनिती सेनापती अंगद, नल करी नेतृत्व
जांबुवंत हनुमंत शेवटी लंका युद्ध तयारी
धर्मनिष्ठ बिभीषण समजावी रामाचे कर्तृत्व ||१||
शिवभक्त रावणाचे गर्वहरण होई लंकापुरी
ककुत्स्थ कुळातील पुरूषोत्तम बंधु रणागंणी
बलवान,युध्द प्रवीण मेघनाथ पडे धारातिर्थी
लक्ष्मण झेली बिभीषणा वरील वार समरागंणी ||२||
बिभीषण समजावी नको अभिलाषा सीतेची
कुंभकर्ण मायावी शक्ती तुडवी वानरसेनेला
लंकेचा सर्व नाश अटळ समजावी मंदोदरी
लक्ष्मणास्तव दास आणी संजीवनी पर्वताला ||३||
लंका विजय, सीता भेटीचा क्षण येई समीप
रावणाचा तीर लागता रथाच्या शिखरध्वजाला
होई अन्यायावर न्यायाचा,सत्याचा जयजयकार
क्रोधित रामाचा तीर छेदी रावणाच्या भाळाला ||४||
बिभीषण होई नृप रावण वध होता लंकापुरी
लंका विजय श्रीराम श्रीराम गुंजे रणक्षेत्रावर
अग्निपरीक्षा देऊनी सतीत्व लाभले सीतेला
पुण्य भाग्याने राम राम वदता तरतो भवसागर ||५||
रघुकुल भूषण निघती दुहितेसह अयोध्येला
देवता गंधर्वाचे सुर लाभे रामसीता मिलनाला
अयोध्या नगरी सजली गुढ्या,पताका,तोरणाने
क्षण नटला सजला अयोध्येत विजयादशमीला ||६||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.