शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाच्या नुतन इमारतीचे 10 एप्रिल रोजी उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, प्लॉट क्र.50 डॉन बॉस्को हायस्कूल जवळ ओरोस सिंधुदुर्गगरी येथील शासकीय संस्थेची नूतन इमारत जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. या शासकीय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व मत्सव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आहे.
यावेळी लोकसभा सदस्य नारायण राणे, विधान परिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे,महिला व बाल विकास सचिव अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, महिला व बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, महिला व बाल विकास विभागीय उप आयुक्त सुवर्णा पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता वीणा पुजारी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अक्षय पवार आदी उपस्थित राहणार आहेत.