कोकणात शिवसेनेकडून काँग्रेसला दे धक्का
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्योजक सहदेव बेटकर शिवसेना पक्षात दाखल
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,माजी आमदार गणपत कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते.