नगरपरिषदेच्या पर्यटक स्वागत केंद्र (टि.आर.सी.) ची नव्याने निविदा काढून केंद्र चालू करणे..
सावंतवाडी न.प. मुख्याधिकारी यांना माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी केले निवेदन सादर
सावंतवाडी
सावंतवाडीत शहरातील नगरपरिषदेच्या जन. जगन्नाथराव भोसले स्मृति शिवउद्यानालगत नगरपरिषदेचे पर्यटक स्वागत केंद्र (टि.आर.सी.) ची इमारत आहे. सदर पर्यटक स्वागत केंद्र गेले आठ महिने बंदावस्थेत आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होत असून त्यापासून मिळणा-या सुविधा पर्यटकांना उपलब्ध होत नाहीत.
तरी नगरपरिषदेच्या पर्यटक स्वागत केंद्र (टि.आर.सी.) ची पुन:श्च निविदा काढून सदर केंद्र चालू करण्यात अशी विनंती माजी उपनगराध्यक्ष
राजू लतीफ बेग यांनी नवनिर्वाचित सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.