You are currently viewing पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

*पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा*

*बांदा

आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली समजली जाते.शारीरिक आरोग्यबरोबर मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे असून यासाठी नियमित व्यायाम, प्राणायाम योगासने करणे आवश्यक असल्याचे मत पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री शांताराम असनकर यांनी व्यक्त केले.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने स्काऊट गाईड कब बुलबुल पथकाच्या वतीने जागतिक आरोग्य दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.यादिवशी योग शिक्षक श्री शेखर बांदेकर यांना विद्यार्थ्यांना विविध आसनांचा व प्राणायाम यांचा सराव‌ घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी ,सकस आहार आदि विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील‌ पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक रंगनाथ परब , फ्रान्सिस फर्नांडिस,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे,कृपा कांबळे , सुप्रिया धामापूरकर‌ यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा