भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यात उत्साह आणि जल्लोषात साजरा
सिंधुदुर्ग
भारतीय जनता पार्टी चां आज 45 वा स्थापनादिन हा जल्लोषमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुक्यातील ९३ बुथ वर झेंडावंदन करण्यात आले. प्रत्येक भाजप प्रमुख कार्यकर्त्याच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकला. वेंगुर्ले शहराच्या हद्दीवर सुद्धा भाजपाचा झेंडा स्वागत करत होता तेथे पदाधिकारी यांनी झेंडावंदन केले.
*तालुका कार्यालयात जल्लोष* –
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयातील मोठ्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांचेही मार्गदर्शन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लाभले. महाराष्ट्रातील दीड कोटी सदस्य नोंदणी केलेल्या संघटनात्मक बांधणी बद्दल मा.रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना शाबासकी दिली. पक्षाचे या कार्यक्रमाचे वक्ते तथा जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांनी पक्षाचे इतिहास, पक्षाची नितिमूल्यें याबाबत मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आणि वेंगुर्ले तालुकाही जिल्ह्यात अग्रेसर राहिला याबद्दल कार्यकर्तेंच अभिनंदन करण्यात आले. सिंधुदुर्ग भाजपाचा स्वतःचा पहिला नगराध्यक्ष वेंगुर्ले तालुक्याला मिळाला याचा गौरव कायम सुवर्ण अक्षरात राहील. तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्षा सुषमा खानोलकर यांनी दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन केले.
*रामनवमी उत्साहात साजरी*
तालुका कार्यालयात श्रीराम नवमी बद्दल श्रीरामांच्या फोटोचे पूजन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, ॲड सुषमा खानोलकर, सरचिटणीस पप्पू परब यांच्या हस्ते झाले या प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हा का सदस्य सौ. वृंदा गवंडळकर, तालुकाध्यक्ष सौ सुजाता पडवळ आणि सर्व सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, बुथ अध्यक्ष या ठिकाणी श्रीरामांच्या जयघोषात सामील झाले होते.
भारतीय जनता पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन, महाराष्ट्रातील दीड कोटीची सदस्य नोंदणी आणि दीड लाखाच्या वर सिंधुदुर्गातील सदस्य नोंदणीच्या विक्रमी यशाच्या जल्लोषात साजरा झाला.
यावेळी उपस्थित श्री प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष) , श्री सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री श्रीकृष्ण परब(सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष), श्री राजन जी गिरप, श्री साई प्रसाद नाईक,(जिल्हा निमंत्रीत), श्री वसंत तांडेल, श्री सोमनाथ टोमके, श्री संदीप देसाई, श्री मनवेल फर्नांडीस(जि. का का सदस्य), )श्री प्रशांत आपटे, सौ सुषमा प्रभुखानोलकर,सौ वृंदा गवंडळकर(जिल्हा उपाध्यक्ष), सौ सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), श्री विजय बागकर , श्री सुधीर गावडे(शक्ती केंद्र प्रमुख), श्री बाळू वस्त(बूथ प्रमुख), सौ शमिका बांदेकर, सौ मयुरी वडाचे पाटकर (सरपंच), सौ सुजाता सावंत, सौ विनया राजाध्यक्ष, सौ मानसी साळगावकर, श्री रमेश परब(बूथ प्रमुख), श्री प्रमोद गोलम , श्री राहुल प्रभू, श्री पुंडलिक हळदणकर, श्री किशोर रेवणकर(बूथ प्रमुख),श्री विरोचन धुरी, श्री शंकर बांदेकर, श्री कृष्णा हळदणकर, श्री नितीन लिंगोजी, सौ कार्तिकी पवार, सौ वैभवी परब, श्री सोमा मेस्त्री, श्री अनिल परब, श्री सत्यविजय गावडे(अनसूर सरपंच ), श्री प्रभाकर गावडे, श्री तुषार सामंत, श्री राजू प्रभुखानोलकर, सौ सावरा देसाई, श्री दिलीप कुर्ले , श्री भानुदास कुबल (बूथ प्रमुख) आदी कार्यकर्ते उपस्थित होते