*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तू किती ग सुंदर आहे…*
तू किती ग सुंदर आहे, तू किती ग सुंदर आहे
जीवनाचा रंगमंच हा, तू मंदिर केले आहे
तू किती ग सुंदर आहे…
लखलखती तू गगन दामिनी सळसळ करत येते
डोळे दिपती तुला ग पाहून लगेच परतून जाते
सहस्रधारा जणू गारवा तू तर अनंत आहे…
तू किती ग सुंदर आहे…
निळी जांभळी गगन शलाका इंद्रधनूचे रूप
पहाट होता धुके बनूनी, उतरते अलगद
दरवळणारा धूप पहाटे तू तर सुगंध आहे..
तू किती ग सुंदर आहे…
पहाटवेळी बनून लाली घुंघट ओढून घेते
किरणांचा तो रथ धुक्यावर ढगपालखी होते
अरूणाचा तो गुलाल फासत अस्फूट हासत राहे
तू किती ग सुंदर आहे..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)