You are currently viewing भास निळासावळा

भास निळासावळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भास निळासावळा*

🎍🎍🎍🎍🎍🎍

मला तर उमगले आहे

सत्य जगी एकच आहे

भावनांचेच मौन आहे

स्पंदनी तुझी ओढ आहे….

 

अव्यक्त शब्दलाघवी

निष्पापीच स्पर्श आहे

निळासावळा शामली

चराचरात भास आहे….

 

द्वैतअद्वैतही निरागसी

मिलनाचा संकेत आहे

गीतातुनी ब्रह्माण्ड सारे

लोचनात तरळले आहे….

 

शब्दाशब्दात मंत्रोच्यारी

सुखनैव शांतताच आहे

जगणेच हे कृतार्थ व्हावे

हीच एकमेव आंस आहे

🎍🎍🎍🎍🎍🎍🎍

*( 34 )*

*©️ वि.ग.सातपुते (भावकवी)*

📞 *(976654908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा