You are currently viewing मळगावातील ‘मराठा प्रिमियर लीग’ चा X-Brand संघ मानकरी, अष्टविनायक संघ उपविजेता

मळगावातील ‘मराठा प्रिमियर लीग’ चा X-Brand संघ मानकरी, अष्टविनायक संघ उपविजेता

*व्हाॅईस ऑफ मिडीया चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा.रुपेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

 

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील आझाद मैदानावर दोन दिवस चाललेल्या मराठा प्रिमियर लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात X-Brand संघाने अष्टविनायक संघाचा पराभव करत पहिल्या ‘मराठा प्रिमियर लीग २०२५’ च्या चषकावर नाव कोरले.

तापमानाचा चढलेला पारा क्रीडा प्रेमींच्या उत्साहावर कोणताही परिणाम करु शकला नाही, रणरणत्या उन्हात चाललेल्या या क्रिकेट लीग स्पर्धेला पंचक्रोशीतील क्रिडा रसिकांनी मैदानावर उत्फुर्तपणे उपस्थिती लावत मराठा मिञमंडळाकडून पहिल्यादाजं आयोजित केलेल्या ‘मराठा प्रिमियर लीग’ स्पर्धेची शोभा वाढवली…

या स्पर्धेचे बक्षीस वितरण व्हाॅईस ऑफ मिडीया चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ, परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब , राजेश राऊळ, गुरुनाथ गावकर मंचावर उपस्थित होते.

‘मराठा प्रिमियर लीग २०२५’ चा विजेता संघ X-Brand तर उपविजेता संघ अष्टविनायक संघ ठरला, तर दुबईवरुन खास या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी आलेला खेळाडू तुषार राऊळ संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरला.

उत्कृष्ट फलंदाज म्हणून समीर मळगावकर, तर उत्कृष्ट गोलंदाज समीर राणे यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेचं यावेळी सर्व संघ मालकांना गौरवण्यात आले.

मराठा प्रिमियर लीग स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्याकडून रोख ११ हजार रुपये , X-Brand चे मालक समीर मळगावकर यांच्याकडून आकर्षक चषक, तसेचं द्वितीय पारितोषिक मराठा मिञमंडळ कडून रोख ७ हजार रुपये , कै. विलास उर्फ बंड्या दामोदर चिंदरकर यांच्या स्मरणार्थ योगेश दामोदर चिंदरकर यांच्याकडून आकर्षक चषक असे ठेवण्यात आले होते, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर चषक कै.श्रीधर राऊळ यांच्या स्मरणार्थ राजेश श्रीधर राऊळ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते.

या स्पर्धेत पंच म्हणून योगेश चिंदरकर, शिवप्रसाद परब यांनी काम पाहिले तर समालोचन उमेश गुडेकर, आदीत्य ठाकूर, हेमंत गोसावी पार पाडले.

मराठा प्रिमियर लीग स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग राऊळ यांनी क्रिडा रसिकांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा