*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेतात शाळा* (बालगित)
वालाच्या शेतात
पिवळी फुले
जशी शाळेत
बसली मुले
बुजगावणे काका
शिकवतात पाढा
वाचून घेतात
घडघड धडा
सारे एकदम
गाणी म्हणतात
वाऱ्याच्या सुरात
डोलू लागतात
शाळेत यांच्या
भिंत ना छपर
हरवून गेले
पाटी दप्तर
कावळे चिमण्या
बघायला येतात
अभ्यास म्हटल्यावर
उडून जातात.
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच फॉरवर्ड करावे