*कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्मा. सदस्या कवयित्री रसिका तेंडोलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी मालवणी*
मालवणी बोली माझी
जीवाभावाची मैत्रीण
फणसातल्या गऱ्यासारी
गोड शब्दांची धनीण
परदेशात फडाकलो
माझ्या मालवणीचो झेंडो
भाषाभैणींच्या वळेसारात
मधी मालवणीचो गोंडो
इनोदासाठी परसिद्ध
माझी तॅॉडभर मालवणी
हिच्या पेटयेत चमाकतत
शब्द इरसाल म्हणी
आज माझ्या मच्छिंद्राचो
आसा प्रकटदिन
तोच करतत साजरो
मालवणी भाषा दिन
वाचूक व्हया लिवक व्हया
बोला तुमी मालवणी
मनापासून प्रेम केल्यार
जपली जायत मालवणी
🖋️रसिका तेंडोलकर
कसाल
९४२११५७६१२