*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -९२ वे
अध्याय – १६ वा, कविता- २ री
__________________________
बोले भागाबाई-पुंडलीका- गुरू ज्ञानी असावा । शास्त्र-निपुण असावा । त्याने भक्ती-पंथ दावावा । आपल्या भक्तांना ।।१।।
गजाननाच्या ठायी । चिन्ह यातले एक ही नाही । असा गुरू कामाचा नाही । पुंडलीका,तू चाल माझ्यासावे ।। २।।
हे शब्द ऐकून । गेले गोंधळून । पुंडलिकाचे मन । काही सुचेना त्यास ।। ३ ।।
मग पुंडलिक बोलला । त्या भागाबाईला । जाऊ उद्या
अंजनगावाला । ऐकू कीर्तन तिथले ।। ४ ।।
झोपेत त्याला स्वप्न पडले । पुंडलीकाने स्वप्नात पाहीले। पुरुष समोर उभे राहिले । समर्थासारखे दिसणारे ।। ५ ।।
तो पुरुष बोले । पुंडलीका, भागीचे शब्द तू ऐकले ।
आणि कबुल केले । सोबत येण्याचे ।।६ ।।
पुंडलीका, कानी काही सांगितले । म्हणून का ते गुरू बोल झाले ? । गुरुमंत्र असा नसे रे ।।७ ।।
गण गण ” मंत्र दिला । कानात त्यास सांगितला । आनंद झाला । त्या पुंडलिकाला ।।८ ।।
***********
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
____________________________
कवी अरुणदास- अरुण वि. देशपांडे – पुणे.
__________________________