You are currently viewing पं पु गावडे काका महाराज यांचे कार्य नविन पिढीला अध्यात्माकडे वळवण्याचे चांगले काम – – – – – ना श्रीपाद नाईक!

पं पु गावडे काका महाराज यांचे कार्य नविन पिढीला अध्यात्माकडे वळवण्याचे चांगले काम – – – – – ना श्रीपाद नाईक!

पं पु गावडे काका महाराज यांचे कार्य नविन पिढीला अध्यात्माकडे वळवण्याचे चांगले काम – – – – – ना श्रीपाद नाईक!

कुडाळ (प्रतिनिधी)

माड्याचीवाडी सारख्या गावात स्वामी समर्थांची सेवा बजावत असताना पं पु गावडे काका महाराज यांनी नविन पिढी अध्यात्माकडे नेण्याचे महान कार्य सुरू ठेवले आहे असे गौरवोद्गार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांनी काढले,
ना श्रीपाद नाईक यांनी सोमवारी अक्कलकोट स्वामी प्रकट दीनाचे औचित्य साधुन अतुल बंगे यांच्या निवासस्थानी भेट दीली होती त्याच वेळी माड्याची वाडी येथील पंपु गावडे काका महाराज यांनी नविन अक्कलकोट स्वामींचा मठ बांधलेल्या मठा मध्ये दर्शन घेतले होते यावेळी श्री नाईक बोलत होते ते म्हणाले या गावात श्री देव गावडोबा देवस्थान जागृत आहे त्याशिवाय स्वामी समर्थांची सेवा प पु गावडे काका महाराज यांनी चालु ठेवुन अंधश्रद्धा हाकलून लावत भक्ती मय वातावरण ठेवत नविन पिढीला अध्यात्माकडे वळवण्याचे महान कार्य सुरू ठेवले आहे असे गौरवोद्गार ना श्री नाईक यांनी काढले
यावेळी ना श्रीपाद नाईक यांचा गावडे काका महाराज यांचे चिरंजीव श्री सुजय गावडे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, भावोजी खानावळ चे मालक पंकज कामत, व पं पु गावडे काका महाराज यांचे चाहते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा