You are currently viewing मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको

मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको

*मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको.*

*सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांका तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा :- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*

मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिवच्या मालवणीत दिल्ल्या आश्वासनाचा स्वागतच आसा. ज्या टायमाक पालकमंत्र्यांनी ह्या मालवणीत आमका आंबा काजू बागायतदारांका आश्वासन दिला त्या टायमाक आमची भावकी दोडामार्ग तालुक्याचे भुमि पुत्र आपल्याच जमीनित उपेक्षित होतले हूनान आमरन उपोषनाक बसलेले तेंच्यासाठीय आमच्या पालकमंत्र्यांनी याक मालवनीत आश्वासन दिल्ला आसता आणि बेकायदेशीर व्हनारी पोटहिश्याची मोजनी थांबयली आसती तर मानला आसता.
एके बाजूक पालकमंत्री ह्या नात्यान जसा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांका आश्वासन दिल्यानी आनी दुसऱ्या बाजूक दोडामार्गातल्या सासोलेक स्वतःची शेतीवाडी वाचवूक उपोषनाक बसलेल्यांका सावत्र पोरासारख्या उपेक्षित ठेयल्यानी ह्याका पटाक नाय.
आनी हूनानच महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडसुन आमची पालकमंत्री नितेश राणे हेंच्याकडे आग्राहाची मागनी आसा काय तर तेंनी दोडामार्ग तसाचा आपल्या जिल्ह्याल्या भुमीपुत्रांका तेंच्याच भुमीतसुन परांगंदा करण्याचो परप्रांतीयांनी पैशाच्या जोरार घातलेलो घाट उघोडो पाडून न्याय मेळवन दिवचो अशी मालवणीत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा