You are currently viewing भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :-  

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाष्ट्रातील नवयुवक नवयुवतीसाठी  दिनांक 5 ते 14 मे 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 61 आयोजित करण्यात येत येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे 29 एप्रिल 2025 रोजी मुलाखतीस हजर रहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. या मुलाखत्तीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pane (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-61 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत.

 अ) कंम्बाईड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

ब) एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

 अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा