कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटोग्राफर यांच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल २०२५ रोजी सिंधुदुर्ग फोटोग्राफर क्रिकेट लीग २०२५ च्या पहिल्या पर्वाचे एक दिवशीय आयोजन करण्यात आले आहे. या लीगच्या स्पर्धा कुडाळ एम.आय. डीसी.येथील फायर ब्रिगेड कार्यालया समोरील मैदानात होणार आहेत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आहे १५ हजार रुपये, दुसरे पारितोषिक १० हजार रुपये, आणि ईतर अनेक बक्षीसे असणार आहेत. क्रिकेट प्रेमिनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग फोटोग्राफर संघटने कडून करण्यात आले आहे.