*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जडले नाते आकाशाशी धरणीमातेचे*
लाभली लावण्य सुंदर कन्या
राजा जनक राणी सुनयनाला
अडकला अग्रभाग सीत भूमीत
नाव सीता परब्रम्ह आदिशक्तीला… .. १
थोर माता पित्याची आयुष्मती सीता
वैदेही असे विदेही जनकाची लाडली
जनकांची मानसकन्या असे जानकी
मिथिलेची राजकन्या असे मैथिली… . २
बालपणी खेळतसे सीता धनुष्याशी
जानकी झाली प्रिय जनकपुरीत
पूजा निरंतर पिनाक धनुष्याची
आली समृद्धी मिथिला नगरीत… … ..३
सीता आहे देवता वदले महाराज
अर्पेन कन्या त्या पुरूषोत्तमाला
केली प्रतिज्ञा महाराज जनकाने
प्रत्यंचा चढवील जो शिवधनुष्याला… .. ४
तयारी स्वयंवराची मिथिला नगरीत
आज्ञा विश्वामित्रांची प्रभू श्रीरामाला
होते विराजमान बलशाली राजे
केला प्रणाम गुरुदेवांना, धनुष्याला… … ५
केले उभे शिवधनुष्य प्रभू श्रीरामाने
दिव्य निनादाने झाले तुकडे शिव धनुष्याचे
आली घेऊन वरमाला भगवती जानकी
नाते जडले आकाशाशी धरणी मातेचे… ..६
स्वयंवर झाले सीतेचे
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
पुणे. 🙏🏻
RKLO 58