You are currently viewing न्हावेली येथे ५ एप्रिलला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

न्हावेली येथे ५ एप्रिलला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

सावंतवाडी :

श्री देवी माऊली मंदिर न्हावेली येथे श्री रामनवमी निमित्त शनिवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ .वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये व चषक,तृतीय पारितोषिक २००१ रुपये व चषक,तसेच प्रथम उत्तेजनार्थ १५०१ रुपये व चषक,द्वितीय उत्तेजनार्थ १००१ रुपये व चषक, व इतर उत्कृष्ट गायक,हार्मोनियम,पखवाज,तबला,कोरस,झांज,गजर यांना प्रत्येकी ५०० रुपये व चषक आणि सहभागी भजन मंडळाना सहभाग प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे.

सहभागी संघ पुढीलप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ पावशी कुडाळ (बुवा प्रियंका तवटे), सायंकाळी ७.३० वाजता ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ मळेवाड (बुवा प्रथमेश मोरजकर), रात्री ८.३० वाजता श्री देवी सातेरी घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ मातोंड (बुवा विशाल घोगळे), रात्री ९.३० वाजता श्री गणेश भजन मंडळ माजगाव (बुवा कृणाल वारंग), रात्री १०.३० वाजता वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप मालवण (बुवा ओमकार येरम), रात्री ११.३० वाजता जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल कुडाळ (बुवा भूषण घाडी), रात्री १२.३० वाजता श्री कोळंबा देव प्रासादिक भजन मंडळ नांदगाव कणकवली (बुवा राकेश तेली), रात्री १.३० वाजता चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी वेंगुर्ला (बुवा अनिकेत भगत) रात्री २.३० वाजता श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ कोंडुरा वेंगुर्ला (बुवा विवेक पेडणेकर) हे संघ सहभागी होणार आहेत. तरी स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा