सहसचिव संजय पिळणकर यांचा झाला विशेष सत्कार!
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हास्तरीय सभा उत्साहात संपन्न!
सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विधायक कार्याने छाप सोडणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची व सदस्यांची सभा सावंतवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात आज संपन्न झाली.
आज संघटनेची ही महत्त्वाची बैठक खेळीमेळीत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष आनंद धोंड, भूषण सावंत, उपाध्यक्ष अमित पालव, मिलिंद धुरी, सहसचिव संजय पिळणकर, खजिनदार आनंद कांडरकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, तसेच संघटनेचे सदस्य प्रतीक राणे, साबाजी परब, प्रथमेश गवस, त्रिविक्रम सावंत यांसह अन्य उपस्थित होते.
या सभेदरम्यान संघटनेची जिल्हास्तरावर योग्य ती संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. तसेच आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी आणि बारावी परीक्षा देऊन निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीनंतर करिअर कसे करावे? यासाठी जिल्हाभरात कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक सदस्याला ओळखपत्र वितरित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील यांसह विविध कार्य करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी होऊन आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसे विधायक कार्य करता येईल? याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली.
या महत्त्वपूर्ण चर्चेत कार्याध्यक्ष आनंद धोंड, भूषण सावंत, उपाध्यक्ष अमित पालव, मिलिंद धुरी, सहसचिव संजय पिळणकर, प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर यांनी विविध विषयांवर आपली मते मांडत संघटनेला दिशा देण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली.
सभेचे प्रास्ताविक व संचालन सचिव शैलेश मयेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष भूषण सावंत यांनी केले.
सहसचिव संजय पिळणकर यांचा सन्मान.!
दरम्यान यावेळी संघटनेचे सहसचिव तसेच एलआयसी ऑफ इंडिया, कुडाळ शाखेचे चेअरमन क्लब मेंबर विमा प्रतिनिधी संजय सखाराम पिळणकर (०००५१९४ई) यांनी पत्रकार म्हणून सातत्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करीत असताना आपल्या विमा व्यवसायामध्ये एक कोटीचा व्यवसाय करून कुडाळ शाखा व सिंधुदुर्ग जिल्ह्याला सन्मान प्राप्त करून दिला. या देदिप्यमान यशाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया, सिंधुदुर्ग संघटनेच्या मान्यवरांच्या हस्ते श्री. पिळणकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.