सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार वीणा पुजारींकडे
कणकवली
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार वीणा पुजारींकडे
सिंधुदुर्ग पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा मारुतीराव पुजारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी १ एप्रिल पासून कार्यभार स्वीकारला आहे.
कणकवली बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे ३१ मार्चला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानंतर कणकवली बांधकाम चे कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. या रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार वीणा पुजारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
वीणा पुजारी ह्या १ एप्रिल २००२ साली २३ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात थेट सहाय्यक अभियंता श्रेणी १ म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या. मागील २३ वर्षांच्या आपल्या शासकीय सेवेत श्रीमती पुजारी यांची रत्नागिरी जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग, आणि उत्तर बांधकाम विभागात उपअभियंता पदी यशस्वी कारकीर्द झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये वीणा पुजारी यांची कार्यकारी अभियंता पदी बढती ने सिंधुदुर्ग पत्तन विभाग येथे बदली झाली. मागील दीड वर्षे त्या सिंधुदुर्ग पत्तन विभाग कार्यकारी अभियंतापदी कार्यरत आहेत.