*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चैत्रमास आला बाई…*
चैत्र मास आला बाई आला मोहोर घेऊन
आधी गेली पाने आता आला अंकूर लेवून..
सजलाय पर्णभार कोवळी ती पाने किती
सुंदर ती दिसतात, हात, झाडावर हलवती…
लाल तांबूस पिवळी गर्द हिरवी ती छटा
मोहोराच्या हलवी हो चैत्र झाडावर बटा…
कैऱ्या डोलती डौलात गुलमोहोर फुलारला
छत्र लालीचे घेऊन पळस पांगाराही आला..
सणासुदीचा आनंद गुढी सुख पावित्र्याची
नांदी नवीन वर्षाची गोड प्रेम नि सौख्याची..
माणूस तो एक आहे हाच संदेश देऊ या
गुढी चैतन्याची हाती सण साजरा करू या….
उत्साहाचे वाण आहे चैत्र जणू शान आहे
उत्सवाची रेलचेल गौरी सुद्धा जान आहे
माळाफुलांनी सजती नटतात गौरी रोज
येता शंकर न्यावया पुन्हा पांघरती साज….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)