राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध कायदे तज्ञ अँड.अनिल निरवडेकर यांचा भव्य सत्कार.
सावंतवाडी
राजा शिवाजी मित्र मंडळाच्या गुढीपाडवा महापूजा निमित्त घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कायदे तज्ञ अँड.अनिल निरवडेकर यांनी केले. सामाजिक क्षेत्रामध्ये अडचणीच्या वेळी सर्वसामान्यांना मदत हात देणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचा मंडळातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
63 वर्षे या मंडळाचे अविरहित कार्य सुरू आहे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मंडळाचे भरपूर योगदान आहे त्यासाठी अँड.अनिल निरवडेकर या दानशूर व्यक्तिमत्त्वाचा हातभार असतो. त्याचप्रमाणे या मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम करून विद्यार्थ्यांच्या तसेच कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, राष्ट्रीय सण साजरे करणे तसचे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मदत करणे अशा अशा गोष्टींना त्यांचा हातभार मंडळांच्या या उपक्रमाबाबत त्यांनी तर त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, ज्येष्ठ पत्रकार, सिताराम गावडे, दिगंबर माठेकर, यशवंत देसाई, संजय पेडणेकर दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार ,अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ, बाळा सावंत,शुभम मळकाचे, गणेश जाधव, उमेश खटावकर, सोन्या कासार, मनोज घाटकर ,चिनू खानोलकर ,उदय भराडी संतोष मेस्त्री, सत्यवान राऊळ, संजय साळगावकर, सुनील साळगावकर, उमेश खटावकर, प्रदीप नाईक व बाबा डिसोजा इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.