You are currently viewing आम. निलेश राणे यांच्या हस्ते मालवण एस.टी.आगारास प्राप्त नवीन बसेसचे लोकार्पण

आम. निलेश राणे यांच्या हस्ते मालवण एस.टी.आगारास प्राप्त नवीन बसेसचे लोकार्पण

मालवण :

मालवण एस.टी.बस आगारास नवीन बसेस मिळाव्या यासाठी कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांनी प्रयत्न केले होते. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती. महायुती सरकारच्या मार्फत ५ बसेस मालवण आगाराला उपलब्ध करून दिल्या आणि आता पुन्हा ५ बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आज मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, मधुरा तुळसकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, राजू बिड्ये, भाऊ मोर्जे, मंदार लुडबे, संदीप भोजने ऋषिकेश सामंत यांसह अनेक पदाधिकारी तसेच एसटी विभागाचे अधिकारी आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी, स्थानक प्रमुख स्वप्निल गडदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

मालवण आगारास प्राप्त झालेल्या एसटी बसेस प्रवासी वर्गाचा प्रवास अधिक सुलभ व आरामदायी करतील, असे सांगत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी प्रवासी वर्गाच्या वतीने आमदार निलेश राणे व महायुती सरकारचे आभार मानले.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा