हॉस्पिटल प्रश्नांवर येथील नेतेमंडळी जरासुद्धा गंभीर नाही येत्या दोन दिवसात अजून तीव्र आंदोलनाची दिशा ठरवणार-रवी जाधव
27 मार्च तारीख नंतर 2 एप्रिल तारीख दिली ती पण तारीख पुढे ढकलून रुग्णांना व आंदोलकांना एप्रिल फुल केलं.
सावंतवाडी
24 मार्चला झालेल्या आंदोलनात हॉस्पिटला फिजिशियन, हृदयरोग तज्ञ व न्यूरोलॉजिस्ट कायमस्वरुपी मिळावा याकरिता मागणी केली होती त्यावेळी सिव्हिल सर्जन यांच्यासोबत या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा होऊन लेखी पत्र घेऊन आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली होती.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांनी आरोग्य संदर्भात विविध प्रश्नांवर आवाज उठून आंदोलन पुकारलं होतं त्याची दखल घेऊन येथील माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांनी 27/3/2025 रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार सावंतवाडी मतदारसंघातील आरोग्य संदर्भात विविध विषयांवर आरोग्यमत्र्यां सोबत तातडीची मीटिंग आयोजित केली होती पण ती काही कारणास्तव पुढे ढकल्ली व 2 /4/2025 एप्रिल तारीख देण्यात आली तसं पत्र देखील सदर संघटनांना प्राप्त झाले होते 27 तारीख गेली त्यानंतर 2 एप्रिल तारीखची वाट पाहतो तोपर्यंत त्याच्या पुढची तारीख देण्यात आली हा काय प्रकार आहे रुग्णांना व आंदोलकांना मूर्ख समजून एप्रिल फुल बनवत आहात का?असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
यावरून असे लक्षात येते की येथील नेतेमंडळी व आरोग्य प्रशासन हॉस्पिटलच्या प्रश्नां संदर्भात जरा सुद्धा गंभीर नाहीत.
त्यामुळे येत्या दोन दिवसात शहरातील नागरिक,शहरातील व गावातील विविध संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन जोपर्यंत डॉक्टर रुजू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील याकरिता आमरण उपोषणाची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल अस असं रवी जाधव यांच्याकडून सांगण्यात आल.
चार दिवसांपूर्वी झालेल्या मळगाव हायवे येथे दोन मोटर सायकल यांच्यात झालेला भीषण अपघात व त्याच्या दुसऱ्या दिवशीच इन्सुली मेटामध्ये कुडाळ पणजी या एसटी बस अपघात यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या ह्या एकूण 40 अपघातग्रस्तांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांन मार्फत दाखल करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील व गावातील सामाजिक कार्यकर्ते अपघातग्रस्तांना रात्री दहा वाजेपर्यंत मदत कार्य करत होते तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा सदर संघटनां मार्फत अपघातग्रस्तांची विचारपूस करण्यात आली परंतु या शहरातील नेते व मोठमोठे राजकीय पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या अपघातग्रस्तांना ढुंकून सुद्धा पाहिले नाही व कोणतीही मदत देखील केली नाही या गंभीर विषयासंदर्भात सुद्धा आवाज उठवला जाणार आहे.
तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश परब व रविंद्र काजरेकर हॉस्पिटल समस्या संदर्भात गंभीर आहेत तसेच इतर गावातून सुद्धा फोन येत आहेत पुढे काय झालं म्हणून परंतु आता शांत बसून न राहता लवकरात लवकर आंदोलनाची दिशा ठरवावी अशी गावागावातून मागणी होत आहे त्यानुसार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना तसेच गावातील विविध सामाजिक संस्था , संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन यापुढे तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव,रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आरोग्य प्रशासन व शासनाला दिला आहे.