सावंतवाडी :
कोलगाव शिवसेनेच्या वतीने व संजू परब पुरस्कृत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शोभा यात्रेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहान गटातून प्रथम आकांक्षा उरणकर, द्वितीय आरव वागळे, तृतीय वेलांकनी गोम्स, उत्तेजनार्थ समर्थ नाईक, चैतन्य मांजरेकर, योजित करमळकर, दुर्वांक सावंत, मोठा गट- महिला प्रथम सान्वी जाधव, द्वितीय प्राची कुंभार, तृतीय स्नेहा ठाकूर, मोठा गट-पुरुष प्रथम पियुष निर्गुण, द्वितीय गुरुनाथ तुळसकर, तृतीय सुनील परुळेकर यांनी क्रमांक पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम १ हजार ५००, १ हजार, तृतीया व उत्तेजनार्थांना रोख रक्कम ५०० व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत १५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख नारायण राणे, महिला उपतालुका प्रमुख निकिता सावंत, विभाग प्रमूख सुशांत ठाकूर, महिला विभाग प्रमुख ॲड. शितल टिळवे, युवासेना विभाग प्रमुख मुकेश ठाकूर आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.