You are currently viewing एका हळव्या बापाची कडवी कविता

एका हळव्या बापाची कडवी कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’एका हळव्या बापाची कडवी कविता’*

*(संजय धनगव्हाळ)*

************************

आई….

प्रत्येकाच्या आयुष्यातील

एक हळवं पात्रं

बाबा…

दुर कुठेतरी एकटाच उभा मात्र

आई सगळ्यांना कळते हो

बाप मात्र कळत नसतो

कळतं नाही बाप का नेहमीच

दुर्लक्षित असतो

 

प्रेम सगळेच करतात हो वडिलांवर

पण आईचं पुढे असते

बाप कष्ट करत असतो बाहेर

आणि आई घरात सगळ्यांन सोबत दिसते

तिच्या सोबत गप्पा मारतील

तिच्या सोबत जेवतील

बाप मात्र जवळ नसतो

जबाबदारीच्या बटव्यात

असाह्य वेदना गोळा करत असतो.

 

साहेबांच्या मालकांच्या

कितीतरी अपशब्दांचे व्रण

बापाच्या अंगावर असतात

कुणालाच सांगत नाही

आतल्याआत जळत असतो

पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव

कुणालाही दिसत नाही

 

बाप स्वतःसाठी कधी जगलाय का

आयुष्यभर त्याची मर मर असते

घडीभर विश्रांती ही नसते

काहीही झालं तरी बाप

वेदना दुःख सारं काही मनात ठेवून

कष्टाच्या वाटेवर धावत असतो

त्याच्या कष्टाच समाधान

लेकरांच्या चेहऱ्यावर बघतो

 

बाप आहे ना म्हणून आपण असतो

तेव्हा बापाला ना केव्हातरी कधीतरी एकदा तरी

प्रेमाने मिठीत घ्यायचं असतं

डोळे भरून बघायचं असतं

क्षणभर पाहिलं ना तर

त्याचा सारा थकवा निघून जातो

बाप पुन्हा कुटुंबासाठी

नव्याने आयुष्य जगतो

 

अरै दिसली नाही की आई कुठे गेली

सगळेच विचारतात

बाबा नाही दिसल्यावर कोण विचारतो

आईच्या अवतीभोवती घोळत राहतात

बाप बिचारा दुरून गंमत पहातो

आई म्हटल्यावर सतर्क होतात

बाप म्हटल्यावर मान वर होत नाही

घरात असूनही बापाजवळ कोणी जात नाही.

 

खरचं बाप कळायला

बाप काही एव्हढा सोपा नसतो

बाप बाप असतो म्हणून तो

डोळ्यातून अश्रू येवू देत नसतो

अवघड असत त्याच जगणं

जगणं सोपं नसतं

बाप समजून घ्यायला

बाप होणं गरजेचं असतं

काय……

 

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा