You are currently viewing जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत; अँड्रॉइड ॲप विकसीत

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत; अँड्रॉइड ॲप विकसीत

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत; अँड्रॉइड ॲप विकसीत

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या तथा सूचनांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे लोकाभिमुख उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. सोबत अँड्रॉइड ॲप विकसीत करण्यात आले असल्याची  माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे.

          शासनाच्या महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री नितेश राणे व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत केलेले आहे. त्यासाठी  जिल्हा परिषदेने “थेट जिल्हा परिषद” “पारदर्शक प्रशासन विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे!” हे Android App Developed  केलेली आहे. ॲपव्दारे सामान्य नागरिक आपल्या समस्या, सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला थेट घर बसल्या विचारू शकतात तसेच त्यांचा पाठपुरावा (Trackig) सुध्दा  त्याच App मध्ये होणार असल्याने नागरिकांना त्यासाठी जिल्हा परिषदेला भेट द्यायची आवश्यकता भासणार नाही.

          संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अंतर्गत प्रसिध्द करावयाच्या 1 ते 17 मुद्यांची माहिती जनतेसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित सेवा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा