सावंतवाडी :
कोकण बोर्ड अव्वल स्थानावर आहे, नेहमीच असतो परंतु शासकीय नोकरीत सदर अव्वल स्थानावर आलेले विद्यार्थी दिसून येत नाहीत. आम्ही कोकण भूमिपुत्र स्वरूपात “तिमिरातूनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोकळ वक्तव्य न करता *निःशुल्क शैक्षणिक कीर्तनाद्वारे* पुढची पिढी प्रशासकीय सेवेत व शासकीय यंत्रणेत कशी दाखल होईल यासाठी जनजागृती/समाजप्रबोधन व मार्गदर्शन करीत असतो. त्यातून यशोगाथा सुद्धा निर्माण होतात व कोणत्याही क्लासेस/अकॅडमी शिवाय निवड होते. सावंतवाडी तालुक्यातील आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत यासाठी जागरूक, परिवर्तनशील व उपक्रमशील सामाजिक संस्था अथवा सावंतवाडीतील भूमिपुत्रांनी/सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावे. *राजकीय आयोजन असता कामा नये.* शैक्षणिक कीर्तन करणाऱ्या मार्गदर्शकाचे नाव, पदनाम, शिक्षण, संपर्क क्रमांक आदि माहिती तळाशी नमूद आहे. गांभीर्याने त्याचे महत्व समजून घ्यावे.
विशेष सूचना:-
👉 शैक्षणिक कीर्तनासाठी कोणतेही मानधन व प्रवास भत्ता आकारला जात नाही.
👉 *कीर्तन १.३० तासांचे असते.* सभागृहाची आवश्यकता नाही, नाट्य मंच, शाळेचे/महाविद्यालयाचे प्रांगण, मोकळी जागा, घराचे अंगण, धार्मिक स्थळांचे पटांगण/जागा कोठेही शैक्षणिक कीर्तन करता येते. त्यामुळे विशेष कोणताच खर्च नाही.
👉 विद्यार्थी/पालकांची उपस्थिती अनिवार्य. फक्त वही व पेन सोबत असू द्यावे. माईक सिस्टम असल्यास श्रोत्यांना आवाज स्पष्टपणे ऐकू जाईल.
👉 खुर्ची आदि व्यवस्था असली तरी ठिक अन्यथा खाली बसून बैठक अवस्थेत सुद्धा ज्ञानाचे व कीर्तनाचे श्रवण करता येते.
👉 संध्याकाळ चा जर कार्यक्रम असेल तर फक्त त्या रात्री, त्या भागात कोणाच्याही घरी राहण्याची/भोजनाची व्यवस्था करावी.
*सत्यवान यशवंत रेडकर* 9969657820
*कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार*
*संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था*
( *शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & PM, PGDT, MA (PUBLIC ADMIN, APPEARED for MA Sociology)*
WhatsApp: *9969657820*
Telegram: https://t.me/timiratunitejakade
Youtube: https://youtube.com/@timiratunitejakade8357
I’m on Instagram https://www.instagram.com/satyaredkar?r good GV=nametag
Facebook: *कोकण शैक्षणिक चळवळ* https://www.facebook.com/groups/579358383837337/?ref=share