तळेरे येथे हॉटेलमध्ये सापडला वृद्धाचा मृतदेह
कणकवली
सायन-मुंबई येथे राहणारे व मूळ गाव भिरवंडे येथील रहिवासी सुभाष वासुदेव राणे (६९) हे २५ मार्च रोजी तळेरे बाजारपेठ येथील हॉटेल न्यू राजवैभव येथे रूम घेऊन राहिले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता ते काम आटोपून रूममध्ये गेले होते. शनिवार, २९ रोजी सकाळी ८:३० वाजता हॉटेलमालक राजकुमार वायंगणकर हे रूम साफसफाई करण्यासाठी गेले असता सुभाष राणे हे राहत असलेल्या खोलीमधून दुर्गंधी येऊ लागली, आतून दरवाजाही बंद होता. हाकेलाही ते प्रतिसाद देत नसल्याने दरवाजाची कडी धक्के मारून उघडली असता सुभाष राणे हे पलंगावर उताण्या अवस्थेत मृत स्थितीत आढळून आले.
सुभाष राणे हे मुंबई येथून गाती कामासाठी आल्यानंतर तळेरे बाजारपेठेतील हॉटेल न्यू राजवैभव येथे दोन-तीन दिवस रूमवर थांबून निघत असत. त्याप्रमाणे ते २५ मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते.