*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कोणा चुकला ना मृत्यू*
जन्माबरोबर येतो
मृत्यू सदा सोबतीला
निसर्गाचे नियमन
निर्मितीला अंत दिला..
व्हावे सुंदर जगणे
मरणाची ती जाणीव
क्षण क्षण आयुष्याचा
आनंदाने जगे जीव….
कमी कोणालेखू नका
नसो मनी मोठेपणा
आयुष्याची कृतार्थता
योग्य कर्म करताना….
साधे सोपे संत बोल
अंगी सदा बाणवावे
घडो ना कधी प्रमाद
ध्यानी सदैव ठेवावे…
बाधा नको विकारांची
सारासार बघायचे
मन ठेवता सत्शील
भय नाही उरायचे…..
ईश चिंतन मनन
धीर येईल मनाला
कधी चुकेना प्रारब्ध
भोग सदा नशीबाला…..
फांदीवर सुकलेली
पडतात पाने जरी
नव पालवी दिसते
येते वृक्षा तरतरी…
उगवती मावळती
सागराच्या खूप लिला
जन्म तसा येतो मृत्यू
स्विकारावे प्रसंगाला….
किर्ती सन्मान मिळावा
असं जगावं जीवन
सार्थकता आयुष्याची
राहो जनात स्मरण…..!!
अरुणा दुद्दलवार@✍️