You are currently viewing परीक्षेचा क्षण

परीक्षेचा क्षण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*परीक्षेचा क्षण*

 

मनात काही नाही दुजे

परीक्षा भाव अत: गाजे |

जळी स्थळी काष्ठी पाषाणी

सर्व स्थळी परीक्षा गाजे ||१||

 

अभ्यास भीती नाहीच रे

अभ्यासतंत्र माझे मित्र |

मी स्मरतो/स्मरते यश शिखरे

विश्व सारे माझेच मित्र ||२||

 

वेळेचा जो समान धागा

असो दूर वा तो निकट |

ते नियम बंधन वेगा

आवरी प्रमाद विकट ||३||

 

भयाला मी कोळून प्यालो/प्याले

अपयश माझे पळून गेले |

मी यशाचाच धनी झालो/झाले

अविचार सारे पळून गेले ||४||

 

अमूल्य जीवन जगण्यासाठी

वेचीन जीवन शास्त्रासाठी |

अपार संयम सुधीर साक्षी

अविरत शुद्ध चिंतन लक्षी ||५||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.-वेंगुर्ला,

जि.-सिंधुदुर्ग, राज्य-महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा