You are currently viewing भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स 2K25’ संपन्न……

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स 2K25’ संपन्न……

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘टेक्सलन्स 2K25’ संपन्न……

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सादर केले नाविन्यपूर्ण प्रकल्प…..

सावंतवाडी

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शनिवार, २९ मार्च रोजी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) मान्यताप्राप्त राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ‘टेक्सलन्स 2K25’ ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. या स्पर्धेने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळवून दिले.

उद्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रशांत काटे, मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रसाद सावंत, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख हर्षल पवार उपस्थित होते. राज्यातील विविध पॉलिटेक्निक संस्थांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट सिस्टीम, रोबोटिक्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर हे प्रोजेक्ट्स आधारित होते. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे –

कॉम्प्युटर विभाग – विजेता : स्मार्ट स्प्रे रोबो युजिंग आयओटी – साक्षी प्रवीण नाईक, सन्मेश निलेश राणे, साक्षी प्रकाश मांजरेकर, राघू नवलू झोरे (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी). उपविजेता : वन कार्ड वन नेशन – पल्लवी जयानंद शिरोडकर, कौस्तुभ रमाकांत सावंत, प्रथमेश प्रशांत केरवडेकर, नुपूर केशव सावंत, गणेश विजय मांजलकर (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी).

मेकॅनिकल विभाग – विजेता : इलेक्ट्रो केमिकल साउंड जनरेटिंग रिपेलर गन – संतोष उमेश शर्मा, सुयोग विजय देसाई, साई सत्यवान नाईक, संदेश गजानन बेळेकर, संदेश शिवाजी कांबळे (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी). उपविजेता : मोटर ऑपरेटेड नारळ सोलण्याचे यंत्र – दिशा अजय ढोके, ओम नितीन घाडी, अथर्व उमेश लाड, गौरेश गुरुनाथ नार्वेकर, आरती रवींद्र राऊळ, मितेश श्रीकांत नाईक (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी).

इलेक्ट्रिकल विभाग – विजेता :रूफ माउंटेड सी वॉटर डिस्टिलेशन प्लांट – प्रतीक झारापकर, सायली गिरी, युवराज राऊळ, हर्षद गवस, प्रसाद राऊळ (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी). उपविजेता (विभागून) : सोलर कार – तन्मय परब, मुरलीधर गावडे, प्रणव गावडे, मधुकर राऊळ, रोहित परब (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी). आयओटी आधारित कंटेनरमध्ये हायड्रोपोनिक शेती – प्रतीक नारकर, गणपत नारकर, तेजस नांदगावकर, चैतन्य न्हावेलकर, अमित देसाई (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ).

सिव्हिल विभाग – विजेता : डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ब्लॅकस्मिथ फर्नेस – केशव भगवान बर्डे, अथर्व गणेश अंधारी, विजय संभाजी गावडे, महादेव उत्तम परब (भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी). उपविजेता : इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट अँड इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय स्पीड ब्रेकर फॉर चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेईकल – प्रतीक्षा संतोष कांदे, आरती विठ्ठल सरकाते, राजनंदिनी विकास खुणे (जयवंत सावंत पॉलिटेक्निक, हडपसर-पुणे).

विजेत्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.मनोज खाडीलकर, आदित्य मसुरकर, प्रा.सौरभ कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, प्राजल चव्हाण, प्रा.सूरज आचरेकर यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शन संचिता कोलापते यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा