ओसरगाव टोल नाक्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप मध्ये सापडले ७९ गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स
१२,८६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; वाहनचालकावर गुन्हा दाखल
कणकवली –
२९ मार्च रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक ( एमएच १५ जिव्ही ११७८ ) हा संशयास्पद वाटला. त्यामुळे लागलीच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी आपल्या सहकारी कर्मचारी व ट्राफिक पोलिसांच्या मदतीने टेम्पोची पहाणी केली. यावेळी त्या टेम्पो मध्ये गोवा बनावटीच्या दारुचे एकूण ७९ बॉक्स दिसून आले. यावेळी मिळून आलेले ७९ बॉक्स व बोलेरो पिकअप क्रमांक ( एमएच १५ जिव्ही ११७८ ) असा एकूण १२,८६,००० रुपये तसेच सदरचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या गुन्हयातील अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई अधिक्षक मनोज शेवरे, यांचा मार्गदर्शनाखाली एस.डी.पाटील दुय्यम निरीक्षक, यांनी कारवाई केली.
या कारवाईमध्ये एस.डी.पाटील, दुय्यम निरीक्षक, जे.एस. मानेमोड व संतोष घावरे, दुय्यम निरीक्षक, एस.एस. चौधरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एस.एस. कुवेसकर महिला जवान ए.टी. गावडे जवान, व ट्राफिक पोलीस हवालदार कॅलिस डिसोजा व नितीन चोडणकर यांनी मदत केली. पुढील तपास एस.डी.पाटील दुय्यम निरीक्षक करीत आहेत.