You are currently viewing शनी

शनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम आध्यात्मिक लावणी*

 

*शनी*

 

परस्त्रीला मानावं आपली माता भगिनी

ओ पाव्हणं, नाहीतर मागं लागलं शनी l ध्रु l

 

लई झाले थेर आता तुमची वेळ भरली

बघता काय असं साठी कवाच सरली

फुकटची उगा का ओढून घेता परेशानी

ओ पाव्हणं, नाहीतर मागं लागलं शनी l १ l

 

घडा पापाचा अजून भरता हो किती ?

सुटता सुटत नाही लागता साडेसाती

यमाचा बंधुराज करील जबरी हानी

ओ पाव्हणं,नाहीतर मागं लागलं शनी l२ l

 

देव कर्माचा ख्याती, ह्याची संथ गती

अहंकारी राजाचीही करतो अधोगती

वाईट नाद सोडून लागा देवाच्या भजनी

ओ पाव्हणं, नाहीतर मागं लागलं शनी l ३ l

 

विलास कुलकर्णी

( आप्पा महाराज )

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा